Ad will apear here
Next
पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांनी साधला काश्मिरी विद्यार्थ्यांशी संवाद
‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून ‘सरहद-जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’चा पुढाकार

पुणे : ‘पुलवामा’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. त्या पार्श्वभूमीवर येथील ‘सरहद’ संस्थेत ‘सरहद - जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’च्या पुढाकाराने पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान यांनी देशवासियांना आवाहन केले होते. त्या धर्तीवर हा संवाद साधण्यात आला. ‘पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांबाबत सदैव उदार दृष्टीकोन बाळगला आहे’, असे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आकीब भट आणि सचिव जावेद वाणी तसेच उपाध्यक्ष ओवेस वाणी यांनी नमूद केले. 

‘या शहरातील लोक चांगले वागणाऱ्यांशी जास्त चांगले वागतात’, असे नमूद करून पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी अथवा विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणीला पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच, ‘आपल्याकडून कोणताही नियम भंग अथवा अतिरेकी कृत्य याला हस्ते परहस्ते मदत होणार नाही याची काळजी घ्यावी’, असे आवाहनही त्यांनी केले. 

समन्वयक जाहिद भट यांनी, ‘अशा प्रकारच्या काही तुरळक घटना जरी घडल्या, तरी करणारा एक असेल तर काश्मिरी लोकांना मदत करणारे शेकडो आहेत. याचा अनुभव पुणे शहरात वेळोवेळी आला’, असे नमूद केले. यावर खान तसेच उमर गुरू या दोघांनी, ‘पोलिसांनी या संवादासाठी पुढाकार घेतल्याने मनातून भीती वाटणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना आधार वाटला’, असे नमूद केले. ‘सरहद – जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष आकीब भट यांनी पुण्यातील काश्मिरी विद्यार्थी तसेच नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना जम्मू काश्मीर सबंधित शासकीय अधिकारी तसेच स्थानिक इतर संघटनांशी समन्वय साधून देणार असल्याचे जाहीर केले. 

या संवादासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू नाथा ताम्हाणे हेदेखील हजर होते. त्यांना काश्मिरी विद्यार्थ्यांच्या समन्वयासाठी नेमल्याचे या प्रसंगी बच्चनसिंग यांनी जाहीर केले, अशी माहिती सरहद संस्थेच्या पत्रकात देण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZYVBY
Similar Posts
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा पुणे : ‘काश्मीरचे पर्यटन आता सुरक्षित असून, यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील नागरिकांची आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही खास पुणेकरांना
कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आव्हान पुणे : कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा १६ जुलै २०१७ला आयोजित करण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. जनरल वेदप्रकाश मलिक (निवृत्त) यांनी मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण केले. या वेळी ‘सरहद’चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संजीव शहा, सतीश बनावट व अरविंद बिचवे, निखील शहा, मोहम्मद हमजा उपस्थित होते
सरहदच्या वतीने जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त| हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’ म्हणजे पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे. अशा शब्दात ज्याचे वर्णन केले जाते त्या जम्मू-काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने कायमच पर्यटकांसह चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे अनेक चित्रपट या पृथ्वीवरच्या नंदनवनात चित्रित झाले आहेत
पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेची ग्वाही पुणे : ‘जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित असून, त्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची दक्षता सरकार आणि पर्यटन व्यावसायिकही घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी निर्धास्तपणे जम्मू-काश्मीरला यावे,’ असे आवाहन जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक निसार ए. वाणी यांनी पुण्यात केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language